HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

‘हिरकणी’ला सिनेमागृह न मिळाल्यास पुन्हा एकदा ‘खळ्ळ खट्याक्’

मुंबई | ‘हिरकणी’ हा मराठी सिनेमा येत्या २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर दुसऱ्या बाजुला बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ‘हाऊसफुल ४’ हा 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. ‘हाऊसफुल ४’ मुळे हिरकणी सिनेमाला सिनेमागृह मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा हिंदी विरुद्ध मराठी असा वाद रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण हिरकणी मराठी सिनेमाला सिनेमागगृह न मिळाल्यास पुन्हा एकदा ‘खळ्ळखट्याक’ करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला आहे.

अभिनेता प्रसाद ओक याने ‘हिरकणी’चे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लेखक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर याने हिरकणीची कथा कथा-पटकथा लिहिली आहे. २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या हाऊसफुलमध्ये अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पुजा हेगडे, क्रिती खरबंदा, नवाजुद्दीन सिद्दीकी, चंकी पांडे, शरद केळकर, राणा डुगुबट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट तब्बल ७५ कोटी रुपये इतके आहे.

Related posts

शिवाजी महाराजांच्या जागी आम्ही उदयनराजेंना मानतो…

rasika shinde

Chhattisgarh Assembly Elections 2018 : मतदार यादीतून नावे गहाळ

News Desk

मराठा आंदोलकांसाठी दिवाकर रावतेंनी मोठी घोषणा

Prathmesh Gogari