HW News Marathi
महाराष्ट्र

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही ! मनसेने शिवसेनेला डिवचले

मुंबई । भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेनेकडून त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पॉस्टर्सही लावण्यात आले होते. मात्र, हे पॉस्टर्स गुजरातीत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टीकेची संधी साधण्यात आली आहे. शिवसेनेकडून या गुजराती भाषेत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर आता मनसेने ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ असा मजकूर लिहीत शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेना ह्यावर काही प्रत्युत्तर देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हेमेंद्र मेहता यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हेमेंद्र मेहता यांच्या प्रवेशाने शिवसेनेने गुजराती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक पाऊल टाकल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, मेहता यांच्या प्रवेशानंतर बोरिवलीत शिवसेनेकडून गुजराती भाषेत पोस्टरबाजी करण्यात आली. त्यावर आता मनसेने काही चिठ्या चिटकवून ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ अशी आठवण करून दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर, पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची अजित पवारांची मागणी

Aprna

इटालीयन गुंतवणूकदारांसाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य! – उपमुख्यमंत्री

Aprna

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळीयेला भेट देणार, ग्रामस्थांची विचारपूस करणार

News Desk