HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे नगरसेवकाने फोडली पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची गाडी

पुणे | पुण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. रुग्णांचे जीवंतपणी हाल होत आहेतच मात्र जीव गेल्यावरही अनेक यातना होत आहेत. अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेच्या वेहिकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास यांची गाडी फोडली.शहरात मृत्युदर वाढत आहे. शहरांमध्ये काही ठराविक स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार होत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना वेटिंगवर थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा आधीच संताप होत असतानाच रुग्णालयांमधून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे.

”भारती विद्यापीठ रुग्णालय ते कात्रज स्मशानभूमी हे अंतर अवघे एक ते दीड किलोमीटरचे आहे एवढ्या अंतरावर जाण्यासाठी चार तास वाट पाहावी लागते. जर एका नगरसेवकाच्या कुटुंबियांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होत असेल असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी वेळेत रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा पुरविता येत नसतील तर त्यांनाही चांगल्या गाड्यांमधून फिरण्याचा अधिकार नाही.नागरिक रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करतील नागरिकांनी उग्र रूप धारण करण्याआधी शासनाने व पालिका प्रशासनाने व्यवस्था सुधारावी, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! तरुणांमध्ये कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात वाढ

News Desk

महाराष्ट्रात इगतपुरी येथे दोन ठिकाणी 100 एकर परिसरात मेडीकल टूरीझम हब उभारणार | जयकुमार रावल

swarit

डॉ. शरद पवार

News Desk