HW News Marathi
महाराष्ट्र

“स्वत: घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचं?”, मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई | राज्यात उद्यापासून ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, बार सुरु होणार आहेत. त्यासाठीची नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. यावरुन पुन्हा एकदा मनसेने शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. “स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचं असा ठाकरे सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न पडत असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले. हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारं आहे, प्रत्यक्षात काहीच केलं जात नाही”, अशी टीकाही देशपांडेंनी केली.

“तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरु करत आहात. एक-एक आस्थापना सुरु करताय, पण त्यासाठी लोकांनी कामावर कसं जायचं? त्या प्रश्नाचं उत्तर सरकार देत नाही’ संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी याबाबत बातचित केली. “नुसती घोषणा करता, १५ ऑक्टोबरपासून लोकल सेवा सुरु करण्यासाठी विचाराधीन आहोत. त्यासाठी विचार करावा लागतो. विचार करण्याचं धाडस सरकरमध्ये नाही’ अशी टीकाही संदीप देशपांडेंनी केली.

‘’10- 15 दिवस झाले आम्ही सातत्याने मागणी करत आहोत, बँक रोज कर्जासाठी तगादा लावत आहे, लोक कामावर गेले नाहीत, तर कसे भरणार हे पैसे?’ असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला. ज्या कॅटेगरी सुरु केल्या, त्या ठिकाणी काम करणाऱ्यांना तरी परवानगी द्या”, अशी मागणी त्यांनी केली.

‘‘लोक आता याचं उत्तर देतील. आंदोलन करुन जर सरकारला अक्कल येत नसेल आणि सरकारला डोकं नसेल तर आपण तरी काय करणार? हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारं आहे, प्रत्यक्षात काहीच केलं जात नाही’’, अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील एखादं आसन सुचवा, अतुल भातकळकरांचा टोला

News Desk

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

News Desk

मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं ही साधी बाब नाही, म्हणून घातपाताची शक्यता वर्तवली, उर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण

News Desk