HW News Marathi
Covid-19

संपुर्ण महाराष्ट्राचा झालाय वांदा, तरीही गोड गोड बोलणे हाच आमचा धंदा !

मुंबई | “कुणीही निंदा, कुणीही वंदा, संपुर्ण महाराष्ट्राचा झालाय वांदा, तरीही गोड गोड बोलणे हाच आमचा धंदा.ओळखा पाहू कोण?,” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज (१९ मे) ट्वीट करत केली आहे. राज्यात चौथ्या लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी काल (१८ मे) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर ट्वीट करत टीका केली आहे.

“मी टीकेचा धनी होईल, महाराष्ट्राला वाचविण्यासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे,” अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. राज्यात चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे आज (१८ मे) संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात १९ हजार ९०० पर्यंत रुग्ण असले तरी ५००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होत आहेत ही चांगली बाब आहे. जर लॉकडाऊन उठवले तर अमेरिका, इटलीसारखी स्थिती होईल. मला महाराष्ट्रात ती परिस्थिती उद्भवू द्यायची नाही. त्यामुळे, मी लॉकडाऊन वाढवल्याचे,” असे त्यांनी राज्यातील जनतेला सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

महाराष्ट्रात उद्यापासून ‘नाईट कर्फ्यू’, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

खरीप हंगामासाठी १७ लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता

News Desk