HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे नाव ‘विधिमंडळ अधिवेशन कोरोना’, मनसेचा सरकारला खोचक टोला

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या अचानक वाढू लागली आहे. काही नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला प्रशअन विचारला आहे, “अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोपही देशपांडेंनी केला आहे.

“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

“तुम्हाला घरी बसा, लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका”

“मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का? तुम्हाला घरी बसायचं आहे तर बसा पण लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका.” असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं.

“अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे?”

“फक्त अचानक अमरावतीमध्ये आकडे कसे वाढले? अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याचं मुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही का?” असंही संदीप देशपांडेंनी विचारलं. “ग्रामपंचायत निवडणुका, शिवसेना-काँग्रेसची आंदोलनं झाली, तेव्हा कोरोना नव्हता का? लोकांना फक्त फसवलं जात आहे” असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेश विसर्जनानंतर महाविकसआघाडीचं विसर्जन होणार !

News Desk

नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार! प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा, लवकरच काँग्रेस प्रवेशाची शक्यता

News Desk

हिंदू असणे हे पाप आहे का?, गडकरींचा सवाल

News Desk