HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे नेत्यामुळे कॉंग्रेसच्या नगरसेवकाचं गेलं पद !

पुणे | पुणे महापालिकेच्या हद्दीत एक महत्वाची घटना घडली आहे. पुण्यातील लोहियानगर कासेवाडी प्रभागातील कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. तसे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुणे न्यायालयाने काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द केलं आहे. या प्रकरणी मनसेचे उमेदवार राहिलेले भूपेंद्र शेंडगे यांनी बागवे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. या दाव्यावर निकाल देताना पुणे कोर्टाने बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, नगरसेवक अविनाश बागवे या निकालाविरोधात 17 जुलैला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आहे.

मनसे नेत्यामुळे कसं रद्द झालं काँग्रेसच्या उमेदवाराचं नगरसेवक पद ?

पुणे महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत लोहियावगर-कासेवाडी या प्रभाग क्र १९ अ मधून अविनाश बागवे यांनी निवडणूक लढवली होती. अॅड भुपेंद्र शेडगे यांनीही मनसेकडून निवडणूक लढवली होती. उमेदवारी अर्ज छाननीवेळी बागवे यांनी प्रतिज्ञापत्र आणि नामनिर्देशन पत्रात विसंगत, अपुर्ण, खोटी माहिती दिल्याचं सांगत शेडगे यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे आक्षेप नोदवला होता. मात्र, त्यांचा आक्षेप तेव्हा फेटाळून लावण्यात आला होता. त्यामुळे शेडगे यंनी मुख्य लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेबाबत झालेली साक्ष, पुरावे, उलटतपासणी या सगळ्याचा विचार करुन न्यायालयाच्या तरतुदींच्या आधारे न्यायालयाने अविनाश बागवे यांचं पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं बागवे यांनी सांगितलं आहे.

कोण आहेत अविनाश बागवे?

अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव आहेत. ते पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 अ मधून निवडून आले होते. 4 फेब्रुवारी 2017 रोजी मनसेचे उमेदवार भूपेंद्र शेंडगे यांनी उमेदवारी अर्जाची छाननी करताना त्यात विसंगत आणि खोटी माहिती दिल्याची तक्रार केली. मात्र, यावर कोर्टाचा आदेश नसल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार फेटाळली. त्यानंतर अविनाश बागवे निवडणुकीत विजयी झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचा-यांना सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार?

News Desk

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी! – मुख्यमंत्री

Aprna

संतापजनक! ऊस वाहतूक गाडी मालकाने १३ ऊसतोड मजुरांसह ९ लहान मुलांना ठेवले डांबून

Aprna