मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने ३० हजारांचा आकडा पार केला आहे. तर राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना हॉस्टपॉट बनले आहे. कोरोनावर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यातील कोरोना रुग्णांवर १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या घोषणेचा केली होती, रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का ?”, असा सवाल त्यांनी केला आहे.
१ मे रोजी राज्यातील #corona_positive १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा केली होती, मग आता पांढऱ्या रेशनधारकांना बिल का आकारले जात आहे ? #corona मुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का ?@CMOMaharashtra @rajeshtope11 pic.twitter.com/cVsbpmRqTS
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) May 17, 2020
राजू पाटील ट्वीटमध्ये म्हणाले, “१ मे रोजी राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा केली होती, मग आता पांढऱ्या रेशनधारकांना बिल का आकारले जात आहे ? कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का ?” असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना टॅग केले आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधितांचा आकडा ४५९ वर पोहोचला आहे. काल (१६ मे) एका दिवसात ३५ कोरोना रुग्ण आढळले आहे. तर आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय १ मे महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.