HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट !

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच पक्षाचा झेंड्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. मनसेचा नव्या झेंड्याचा रंग केशरी झाला असून यात छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. मनसेच्या या नव्या झेंड्यावर मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर चालणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचा फोटो असलेला भगव्या रंगाचा बॅनर ट्विट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या 23 जानेवारीला राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

मनसेच्या या नव्या बॅनरमध्ये “सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट,” असे मचकुर लिहिलेले पोस्टर लावले आहे. यात राज ठाकरेंचा फोटो असलेला भगव्या रंगातील बॅनर वाऱ्यासारखा पसरला आहे. हे बॅनर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीही एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती म्हटले की, “लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणे जुळू शकतात, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते.

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट

‘सध्या ‘मनसे’सोबत युती नाही, कार्यपद्धती बदलली तर युतीवर चर्चा करण्यासाठी तयार,’ असे वक्तव्य विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत भेटीसंदर्भात बोलताना म्हणाले होते. फडणवीस पुढे म्हणले की, मनसे आणि भाजप यांच्यासोबत एकत्र येण्याची शक्यता नाही, असे म्हणत त्यांनी मनसे-भाजप युतीच्या सर्व चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला आमच्या विचारमध्ये अंतर असून भविष्यात मनसेचे कार्यपद्धती बद्दली तर विचार होईल, असे सूचक विधान देखील फडणवीसांनी गुरुवारी (९ जानेवारी) एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“याला कोण जबाबदार आहे? केंद्राने विचार करावा” जनआशीर्वाद यात्रेच्या गर्दीवरुन अजित पवार संतापले!

News Desk

…तर मुलाने मुलासारखे वागले पाहिजे !

News Desk

“गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही”

swarit