मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणार सर्वात मोठी घटना आज घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज (७ जानेवारी) भेट झाली आहे. या दोघांची भेट मुंबईतील प्रभादेवी येथे झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटींने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे
दरम्यान, मनसे आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून, त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे यापुढेच्या काळात मनसे हिंदुत्वाचा आधार घेणार असल्याच्या असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत. त्याबरोबरच हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यास राज्यात भाजप आणि मनसे असे युतीचे समीकरण उदयास येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीही एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती म्हटले की, “लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणे जुळू शकतात, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.