HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या राजमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचे अनावरण

मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यभागी राजमुद्रा आहे. राज ठाकरे यांनी आज (२३ जानेवारी) राज्यव्यापी महाअधिवेशन होणार आहे. गोरेगाच येथील नेस्को सेंटर मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मनसेने नव्या झेंड्यातून हिंदुत्ववादी विचारांची कास धरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सध्या मनसेच्या अधिवेशनात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. आजच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने राज ठाकरेंचे पुत्र अमित यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. या महाअधिवेशनात विविध मुद्द्यांवर सात ते आठ ठराव मांडले जाणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राजकीय ठराव मांडल्यानंतर शेवटच्या सत्रात राज ठाकरे यांचे समारोपाचे भाषण असणार आहे.

https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/2936894702996374/

 

मनसेच्या या महाअधिवेशनासाठी पुणे, सातारा, जळगाव, पिंपळगाव, नाशिक राज्यभरातून हजारो कायकर्ते मुंबईत पोहोचत आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार आणि मनसेचा नवीन ध्वज प्रत्यक्ष बघण्याची उत्सुकता त्यांच्या मनात आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या PI लगडचा बाप कोण आहे, ते आम्ही शोधून काढू”, चित्रा वाघ कडाडल्या 

News Desk

रामदास आठवले म्हणजे अर्धे शटर बंद झालेले दुकान !

News Desk

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

News Desk