HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेच्या मोर्च्याचा असा आहे मार्ग

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशीं विरोधात आज (९ फेब्रुवारी) मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार असून हा मोर्चा शांततेत कसा पार पडेल याकडेही त्यांचे लक्ष असमार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. या मोर्च्याचा आधीचा मार्ग हा भायखाळ्याची राणी बाग ते आझाद मैदान असा असणार होता पण त्या मार्गावर मुस्लिम वस्ती जास्त असल्याकारणाने पोलिसांनी या मार्गाला परवानगी दिली नव्हती. परंतु आता या मोर्च्याचा मार्ग गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा असेल.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1226062218795474949?s=20

दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून या मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. मनसेचे कार्यकर्ते, मोर्च्यात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक राज ठाकरेंच्या मागे असतील. या मार्गावरुन पुढे जात शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ पोहोचल्यावर राज ठाकरे काही नेत्यांसमवेत महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील. आझाद मैदानात या मोर्च्यासाठी उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणे होतील. आणि अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण होईल. नेमकी हा मोर्चा का काढला याचे कारण आपल्या भाषणातून राज ठाकरे सगळ्यांसमोर मांडतील.

मनसेच्या मोर्च्याची रुपरेषा

  • दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्च्याला होणार सुरुवात
  • शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा मेट्रो सिनेमाकडे वळणार
  • राज ठाकरे महानगपालिकेच्या मार्गावरुन आझाद मैदानात प्रवेश करणार
  • मनसे नेत्यांच्या भाषणानंतर राज ठाकरे आपल्या भाषणातून मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाडच्या तळीये दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या आकड्यात वाढ, ३६ लोकांच्या मृत्यूची नोंद

News Desk

देवेंद्र फडणवीस बोलतात त्या सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही – संजय राऊत  

News Desk

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३०८१ वर, १६५ रुग्ण वाढले

News Desk