HW News Marathi
महाराष्ट्र

‘भाजपच्या कामाची पोलखोल झाली पाहिजे’, राज ठाकरेंची मागणी

पुणे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. भाजप-मनसे युती होत्ये न होत्ये अशी चर्चा सगळीकडे चालू होती. यातच आता महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटीच्या पुढे गेले आहे, पण त्यातून नागरिकांना काय सुविधा मिळाल्या ? एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठे गेला याची माहिती घेऊन सत्ताधारी भाजपने काय केले याची पोलखोल करा. आगामी महापालिका निवडणूकीसाठी आपापल्या वॉर्डाचे संघटन मजबूत करा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे.

भाजपशी युती नाही

मनसे आणि भाजपची युती यावरून राजिक्य वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र आता मनसेची भूमिका स्पष्ट झाली आहे. संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज नाशिकच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे. दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी भाजपला लगावला आहे.

नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी नाशिकचं मनापासून संगोपन केलं आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे आता पुणे दौऱ्यावर

राज्यात आता निवडूकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे सगळेच पक्ष आपल्या पक्षाला उभारी आणि बळकट करण्याचं काम करत आहेत. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सध्या राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. मात्र, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९ ते २१ जुलै असे तीन दिवस पुणे दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात आजीमाजी पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कष्टकरी ऊसतोड कामगरांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न!– अजित पवार

Aprna

पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

News Desk

मोदींच्या आवाहनानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची वेगवेगळी भूमिका

News Desk