HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून अमित ठाकरेंनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर डोके टेकले

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी (९ जुलै) मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर, मागण्यांवर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांची उत्तरे ऐकून अमित ठाकरे यांनी चक्क रेल्वे अधिकाऱ्यांपुढे डोके टेकले. मध्य रेल्वे प्रशासनाचा कारभार आणि वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी बोलताना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांवर अमित ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मनसेच्या शिष्टमंडळाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे वेळापत्रक, महिला प्रवाशांची सुरक्षा, पावसाळ्यात होणारा रेल्वेचा खोळंबा, मेगाब्लॉक अशा अनेक मुद्द्यांवरून अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, यावेळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अनपेक्षित उत्तरांमुळे नाराज झालेल्या अमित ठाकरे यांनी चक्क अधिकाऱ्यांसमोरच डोके टेकले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसतिगृह, सांस्कृतिक भवनाची कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास कारवाई! – मंत्री धनंजय मुंडे

News Desk

“एकमेकांच्या मुळावर येणार असाल तर ते सहन होणार नाही, संजय राऊतांचा इशारा

News Desk

उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावले मुकेश अंबानी, गुजरातवरुन महाराष्ट्राला देणार ऑक्सिजन

News Desk