HW News Marathi
महाराष्ट्र

वरूण सरदेसाई म्हणजे ‘रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू’ मनसेची टीका !

मुंबई | एकीकडे सध्या भाजपकडून युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांना टार्गेट केले जात असतानाचं मनसेनेसुद्धा त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे.वरुण सरदेसाई म्हणजे रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू आहेत,अशी टिका मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आरोप केले होते. या प्रकरणी वरुण सरदेसाई यांनी देशपांडे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यामुळे देशपांडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या आधी वरूण सरदेसाई यांनी देशपांडे यांना या प्रकरणी नोटीसही बजावली होती.

नेमकं प्रकरण काय ?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील कोविडचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता, भ्रष्टाचारात सत्ताधाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला होता. देशपांडे यांनी या भ्रष्टाचारात ‘पेंग्विन गँग’ असल्याचं देखील म्हटलं होतं. त्यामुळे वरूण सरदेसाई यांनी या प्रकरणी संदिप देशपांडे यांना जानेवारीत वकिलामार्फत नोटीस बजावली होती. त्यानंतर आता सरदेसाई यांनी देशपांडे यांच्याविरोधात मॅजिस्ट्रेट कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यामुळे देशपांडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे

वरूण सरदेसाई म्हणजे “रडू बाई रडू”

वरूण सरदेसाई यांनी दावा केल्याने त्यावर मनसेच्या संदीप देशपाडेंनी उत्तर दिलं आहे. राजकारणात जशी दोन द्यायची तयारी असते तशीच दोन घ्याची तयारी ठेवायला हवी. ते माझ्या विरोधात कोर्टात गेले आहेत. त्याला माझे वकील कोर्टात उत्तर देतील. आरोप केले आहेत तर त्याचे उत्तर द्या. प्रत्येक गोष्टीला अब्रुनुकसानीचा दावा करत बसले तर त्यांचे आयुष्य कोर्टात जाईल, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसैनिक हा माझा प्राण आहे, माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे – बाळासाहेब ठाकरे

News Desk

पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात बैठक संपन्न, सकारात्मक चर्चा झाल्याची सर्वच नेत्यांची माहिती

News Desk

नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला – पृथ्वीराज चव्हाण 

News Desk