HW News Marathi
महाराष्ट्र

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आता मनसेच्याही रडारवर

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी होती. त्याच्या मालकाचा संशयास्पद मृत्यु झाला. यावरून आता राजकरण तापलं आहे. अधिवेशनात देखील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हा मुद्दा उचलून घेतला आहे. काल (६ मार्च) मुंब्रा क्रिक येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आणि गोंधळ उडाला.

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेने टीका केली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत? असा सवाल मनसेने केला आहे. त्यामुळे आधीच भाजपच्या निशाण्यावर असलेले वाझे आता मनसेच्याही निशाण्यावर आल्याचं म्हटलं जात आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून हा आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर पुढील अनेक वर्ष चांगल्या कामासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील ! | धनंजय मुंडे

News Desk

शिवसेना म्हणजे कन्फ्यूज पक्ष, शिवसेनेने आधी भूमिका ठरवावी- फडणवीसांचा खोचक सल्ला

News Desk

मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला नवी ऑफर

News Desk