HW News Marathi
Covid-19

पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मनसेचा इशारा

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. आर्थिक अडचण, रुग्णांचे हाल होत आहेत. अशा कोरोनाच्या संकटकाळात देखील मुंबई महापालिकेचे काही अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केले आहेत.

संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुमड्या भरून घेत आहेत. पण त्यांच्यावर आमची करडी नजर आहे. हे कोरोनाचं संकट गेलं की त्यांना रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

मुंबई महापालिकेत माजी नगरसेवक राहिलेले संदीप देशपांडे कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेच्या कारभारावर सतत लक्ष ठेवून आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड, अधिकाऱ्यांचा कारभार याबाबत ते वृत्तवाहिन्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं आवाज उठवत आहेत.

‘महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सध्या महाराष्ट्रात १ लाखांच्या पुढे कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे.. त्यातच कोरोनाच्या चाचण्या नीट होत नाहीत. चाचण्या झाल्याच तर रुग्णवाहिका मिळत नाहीत. रुग्णवाहिका मिळालीच तर सरकारी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाहीत. जागा मिळालीच तर रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे. खासगी रुग्णालयांचं बिल परवडत नाही,’ अशी खंत देशपांडे यांनी व्यक्त केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हा बिघाड अपेक्षित होता कि अनपेक्षित ? गाफिलपणा झालाय का ?” | मुख्यमंत्री

News Desk

राज्यातील महाविद्यालयाच्या परीक्षांबद्दलचा निर्णय उद्या जाहीर होणार

News Desk

देशात कोरोनाचा कहर ! मृतांच्या आकड्याने गाठला उच्चांक

News Desk