HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचे वाहतूक अध्यक्ष यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पत्रातून केल्या ‘या’ मागण्या

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे महाराष्ट्राच्या वाहतूक क्षेत्रासमोरही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांचे रोजगार संकटात आहेत. रिक्षावाले, टॅक्सीवाले, खासगी बसेस आणि जड वाहनांच्या लहान-मोठ्या कंपन्या, ही वाहनं चालवणारे ड्रायव्हर्स, क्लिनर्स असे लाखो लोक या वाहतूक व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना एक पत्र पाठवून वाहतूक क्षेत्राला आर्थिक दिलासा देण्याबाबत काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

वाहतूक क्षेत्राला दिलासा देण्यासाठी’ पंजाब सरकारने १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या वाहनांवरील ‘मोटर वाहन कर’ माफ केलेला आहे. या वाहनांमध्ये स्टेज कॅरेज बसेस, टुरिस्ट बसेस, शाळा बसेस, मिनी बसेस, मॅक्सी कॅब, तीन चाकी वाहने, मालवाहतुकीची वाहने यांचा समावेश आहे. पंजाब राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांचा ‘मोटर वाहन कर’ माफ व्हायलाच हवा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक!

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी

News Desk

राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’) चे सहकार्य मोलाचे ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna