HW News Marathi
महाराष्ट्र

नरेंद्र मोदींना ‘मोदीभक्तांकडून’ अनौखी भेट!

पाषाण | आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रेमापोटी कार्यकर्ते काहीही करू शकतात. यायचाच एक उदाहरण म्हणजे मोदीभक्तांकडून उभारलं गेलेलं मोदी मंदिर. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाच्या मुहूर्तावर पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. औंध गावात हे मंदिर असून यात मोदींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. मोदींच्या कार्यावर आधारित काव्याची रचना करून तीही येथे मोठ्या फलकावर झळकावण्यात आली आहे. मोदींचे हे पुण्यातील पहिलेच मंदिर असून, देशपातळीवरही या प्रकारचे पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.

औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व अन्य कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारले आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती फार मोठे योगदान आहे

या वेळी ॲड. मधुकर मुसळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती फार मोठे योगदान आहे. त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे आज भारताला जागतिक स्तरावर चांगले स्थान प्राप्त झाले आहे. या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे आचार-विचार जोपासले जावेत. त्यांच्या कार्यापुढे सर्वांनी नतमस्तक व्हावे. मोदी हे एक प्रकारे देव असल्यानेच त्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे.”

‘मोदी भक्तां’साठी कविता

यावेळी मोदी भक्तांनी त्यांच्यासाठी केलेल्या कविता अमंदिराच्या आवारात लावल्या जाणार आहेत. मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता ‘मोदी भक्तां’साठी मंदिराजवळील फलकावर लावण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचा अर्धाकृती पुतळा असलेल्या या मंदिराला स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. नगरसेविका अर्चना मुसळे, ॲड. मधुकर मुसळे, केसारामजी परिहार, शेखर विघ्ने, ओमरामजी चौधरी, मिलिंद कदम, आशुतोष देशपांडे, अक्षय सांगळे, संकेत सांगळे, वेलारामजी चौधरी, विनय शामराज आदी या वेळी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल’,नाना पटोलेंचा मिश्किल टोला!

News Desk

माझ्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी आहे, मुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

News Desk

‘सत्ता आज आहे, उद्या नाही… सत्तेचा एवढा माज बरा नव्हे’

News Desk