HW News Marathi
देश / विदेश

तालीबानी थेट गोळ्या घालतील ,आई-वडिलांना भारतात आणण्यासाठी मोहम्मदची सरकारकडे याचना !

पुणे | तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर कब्जा केला. तालिबानने अफगाणवर ताबा मिळवल्यावर तिथे थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अफगाणी नागरिकांमध्ये तालिबानची दहशत निर्माण झाली आहे आणि त्या भीती पोटी तिथले नागरिक तातडीने देश सोडायच्या विचारात आहेत. आपल्या देशातले काही नागरिक जसे तिथे अडकले आहेत, तसेच भारतात राहणाऱ्या अफगाणी नागरिकांचे परिवार तालिबानच्या ताब्यात अडकले आहेत. मोहम्मद अहमदी, मूळचा अफगाणचा पण कामासाठी पुण्यात राहणारा. त्यांचा परिवार हा आज अफगाणमधल्या तालिबानच्या ताब्यात आहे. याबाबत त्यांनी एच. डब्ल्यू न्यूज मराठीशी संवाद साधला आहे.

तुम्ही अफगाणिस्तानमधून पुण्याला केव्हा आलात ?

मोहम्मद अहमदी मूळचे राहणारे अफगाणिस्तान मधले,परंतु त्यांनी सांगितलं कि, “मी अगोदर अफगाणमध्ये U.S फोर्स मध्ये कार्यरत होतो .मात्र २०१०-२०११ पासूनच तालिबान आक्रमक होऊ लागला आणि अभ्यासाच्या बहाण्याने मी पुण्यात निघून आलो. मात्र माझे वडील मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर मध्ये आणि आई शाळेत शिक्षिका असल्याने त्यांना तिथंच राहावं लागलं,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तुमचे कुटुंबीय अफगाणिस्तान मध्ये सुरक्षित आहेत का ?

मोहम्मद अहमदी यांनी माहिती दिली की,त्यांचे कुटुंबीयच नाही तर अफगाणिस्तानमध्ये सगळेच नागरिक असुरक्षित आहेत. तिथली विमानसेवा संपूर्णतः बंद आहे आणि नागरिकांचं येणं जाणं बंद केलं आहे. अशा परिस्थितीत अफगाणवरून भारतात येणं कठीण झालं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की,तालिबानचा काही भरोसा नाही ते कधी काय करतील याचा नेम नाही. तिथल्या नागिरकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला मोहम्मद अहमदी यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकार कडून तुम्हांला तुमच्या कुटुंबीयांना कोणती मदत करण्यात आली?

मोहम्मद अहमदी यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांची परिस्थिती सांगितली. त्यावर ते म्हणाले कि, “आदित्य ठाकरेंनी केंद्राकडे पत्र पाठवून आमच्या व्यथा त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या आहेत. आमच्या परिवाराकरिता तत्कालीन विझा सुद्धा बनवून मिळाले आहेत. परंतु आमच्या घरच्यांना सुखरूप भारतात आणलं जाईल कि नाही याची हमी मात्र कोणीच दिली नाही आहे. आमचं बोलणं ऐकून केवळ आम्हांला आश्वासन दिलं आहे”, असं अहमदी म्हणाले आहेत.

सध्या अफगाणिस्तानातल्या कुटुंबाची काय परिस्थती आहे? संपर्क झाला का ?

मोहम्मद अहमदी यांचं कुटुंब अफगाणमध्ये अडकलेलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यांनी यावेळी सांगितलं कि तिथली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांच्या त्यांच्या परिवाराशी काहीच संपर्क होऊ शकत नाही.कारण तिथे ना वीज आहे ना नेटवर्क आहे. जर संपर्क होऊ शकला तर सगळ्यात पहिला अहमदी त्यांच्या कुटुंबियांना तो देश सोडण्यास सांगणार आहेत. ‘तालिबानी नागरिकांच्या घरात जाऊन जर त्यांना काही संशयास्पद कागदपत्रं मिळाली तर तिथल्या तिथे त्या व्यक्तीला गोळी घालत आहेत,अहमदी यांनी सांगितलं कि तिथली परिस्थिती इतकी वाईट झाली आहे कि नागरिकांना देशातून बाहेर पडणं देखील बंद केलं आहे. तिथल्या नागरिकांना पुरेपूर त्रास तालिबान देत आहे’, असं ते म्हणाले आहेत.

तालिबानच्या भूमिकेबद्दल काय वाटतयं ?महिलांना खरचं स्वातंत्र्य मिळेलं?

एकीकडे जिथे तालिबान पत्रकार परिषद घेऊन महिलांचा आदर केला जाईल आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी आश्वासनं देत आहेत, तिथेच दुसरी कडे महिला जर एकट्या बाहेर पडल्या तर त्यांना मारलं जातंय. महिलांनी एखाद्या पुरुषा सोबत बाहेर पडणं बंधनकारक आहे. तालिबान खूप आधीपासून कब्जा करायच्या तयारीत होते, आणि आता ते त्यांच्या योजनेत यश मिळालं आहे,असं मोहम्मद म्हणाले.

अफगाणिस्तानमधील तालिबानच्या या दहशतीमागे नेमका कोणाचा हात?

‘अफगाणमध्ये जी भयावह परिस्थिती ओढवली आहे ती केवळ पाकिस्तान मुळेच’, असा दावा अहमदी यांनी केला आहे. अहमदीने सांगितलेल्या माहिती प्रमाणे पाकिस्तान आधी पासूनच अफगाणवर डोळा ठेऊन होती आणि आता शेवटी तालिबानला पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांनी अफगाणवर हल्ला केला. इस्लामचा शरिया कायदा जबरदस्ती वापरला जातोय.

पाकिस्तान आणि भारताचं खूप आधी पासूनच वैर आहे. पाकिस्तानकडे सध्या इतके पैसे नाहीत कि ते कुठल्यातरी राज्यावर हल्ला कारयु शकतील आणि म्हणून सौदी अरेबियाच्या मदतीने , त्यांच्या कडून देणगी घेऊन तालिबानला मदत केली गेली आणि पूर्णपणे नियोजन करून काबुल आणि अफगाणवर हल्ला केला. तालिबान्यांनी तिथल्या शाळांना देखील कुलूप लावलं आहे, आणि जर शाळा सुरु केल्या तर गोळ्या घातल्या जातील अशी धमकी त्यांनी दिली आहे.

मोहम्मद सध्या पुर्णपणे प्रयत्न करतायत की आई-वडिल सुरक्षित राहावेत.असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची कुटुंब सध्या अफगाणिस्तानमध्ये अडकली आहेत .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, हात उंचावून मानले सर्वांचे आभार !

Arati More

काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

News Desk

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आयईडी स्फोट २ जवान शहीद

News Desk