मुंबई। वेगवेगळ्या कारणांमुळे जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे तिथे समस्या निर्माण झाल्यात, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. याच कारणामुळे संघ हा सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबद्दल चर्चा करणार असल्याचं भागवत म्हणाले आहेत. हिंदू राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाचं कल्याण होईल, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केलाय. करोना कालावधीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदूत्व आहे, असं भागवत यांनी यावेळी हिंदूत्वाची व्याख्या सांगताना म्हटलं. अशा कामांमध्ये सर्वांच्या कल्याणाची भावना असते. हिंदूंची लोकसंख्या कमी झालेल्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्याच्या भागवत यांच्या वक्तव्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय.
आपण सर्वजण भारतमातेची लेकरं आहोत
मोहन भागवत यांनी राजस्थानमध्ये उदयपुरमधील विद्या निकेतन सेक्टर ४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांच्या विचारांबद्दल भाष्य केलं. हेगडेवार यांनी हिंदू सामाजाला एकत्र आणल्यास भारताच्या सर्व समस्यांवर समाधान मिळवता येऊ शकतं असं म्हटल्याची आठवण भागवत यांनी करुन दिली. आपण सर्वजण भारतमातेची लेकरं आहोत. हिंदू हे सनातन संस्कृतीला मानणारे आहेत. सनातन संस्कृतीच्या विचारसणीमधील संस्कार हे संपूर्ण विश्वाचा विचार करण्याची शिकवण देतात. हिंदूंच्या विचारसरणीमध्ये शांती आणि सत्य या दोन गोष्टींचा समावेश आहे. आपण हिंदू नाहीत अशा प्रकारची एक मोहीम देश आणि समाजाला कमकूवत बनवण्याच्या उद्देशाने राबवली जात असल्याची टीका भागवत यांनी केलीय.
याच चिंतनातून झाला संघाचा जन्म
संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांनी भारतामधील विविधतेच्या तळाची एकतेचेचा भाव असल्याचं ओळखलं होतं, असंही भागवत यावेळी म्हणाले. अनेक पिढ्यांपासून या पुण्यवान प्रदेशामध्ये राहणाऱ्या पूर्वजांचे आपण वंशज असून सर्वचजण हिंदू आहोत. हाच हिंदुत्वाचा भाव आहे, असं सांगताना भागवत यांनी हेगडेवार यांच्या कार्याची माहितीही दिली. हेगडेवार यांननी आपल्या खासगी स्वार्थाची आहुती देत भारतासाठी काम करण्याचा मार्ग स्वत:च्या इच्छेने निवडला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पुन्हा इतरांवर अवलंबून राहता कामा नये यासाठी काम करण्याची गरज हेगडेवार यांनी ओळखली. याच चिंतनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला, असं भागवत म्हणाले.
संघ आज जगातील सर्वात मोठी संघटना…
संघ हा जागतिक बंधूभाव जपण्याच्या भावनेने काम करतो. संघासाठी संपूर्ण विश्व हे समान आहे. संघाला लोकप्रियतेची हाव नाहीय. श्रेयवाद, लोकप्रियता संघाला नकोय. ८० च्या दहशकापर्यंत हिंदू शब्द हा सार्वजनिकपणे बोलायलाही टाळलं जायचं. संघाने अशा परिस्थितीमध्ये प्रवाहाविरोधात जात काम केलं. सुरुवातीच्या काळामध्ये साधनांची कमतरता असतानाही संघ काम करत राहिला आणि आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखला जातो, असं भागवत यांनी संघाचा प्रवास सांगताना म्हटलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.