HW News Marathi
महाराष्ट्र

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, चित्रा वाघ पुन्हा एकदा कडाडल्या!

मुंबई। पुण्यातल्या वानवडी बलात्कार प्रकरणावर बोलताना भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ संतापल्या आहेत. राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये असा आरोप करत मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे. दुसरीकडे कालपासून राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय. वानवडी प्रकरणावर बोलताना त्यांनी मेहबूब शेख यांचं नाव घेताना, त्याच्यासारखे बलात्कारी मोकाट फिरतायत, त्यामुळे विकृतांना बळ येत असल्याची घणाघाती टीका केली आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या…

“पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झालाय. मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात. आरोपींना पुणे पोलिसांनी अटकही केलीय राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये.”“एकीकडे गृहविभाचा काडीचाही वचक न राहिलेल्या आणि दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की. मुख्यमंत्रीजी लक्ष द्या”, असं ट्विट करत वानवडी प्रकरणावर बोलताना त्यांनी मेहबूब शेख यांच्यावरही निशाणा साधला.

काय आहे नेमकं प्रकरण?

पीडित 14 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मी वाघ, ती कशी, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “लंकेच्या सभेत मला आव्हान देतोय… तोच लंके जो एका महिला तहसीलदाराला अॅट्रोसिटीच्या धमक्या देतो…. तो वैद्यकीय अधिकाऱ्यांवर धावून जातो, डॉक्टरला गलिच्छ भाषेत बोलतो… म्हणजे ज्याच्याविरोधात आम्ही बोलणार, तिथे जाऊन तुम्ही आमच्यावर टीका करणार….. अरे जा रे जा…. मी वाघ आहे वाघ… आणि ती कशी, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा……., असा पुनरुच्चार चित्रा वाघ यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑनलाईन शिक्षण असूनही पालकांवर फीसाठी दबाव आणणाऱ्या संस्थांवर कारवाई होणार – वर्षा गायकवाड

News Desk

फडणवीस सरकारच्या काळात धारावी पुनर्वसन प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा! – नाना पटोले

Aprna

वाह रे ठाकरे सरकार ! एकीकडे एका बेडवर २-२ रुग्ण, तर दुसरीकडे हजारो बेड्स रिकामी !

News Desk