HW News Marathi
देश / विदेश

मान्सून श्रीलंकेत दाखल, येत्या ४८ तासात मुंबईसह राज्यभरात मान्सूनपूर्व सरी बरसणार

नवी दिल्ली | देशातील जनता ही उकाड्याने हैराण झाली असून अतुरतेने मान्सून वाट पाहत आहे. श्रीलंकेत काल (३ जून) मान्सून दाखल झाला असून लवकरच भारतातही दाखल होईल. येत्या दोन दिवसांत तो केरळमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविले आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील ४८ तास मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असाही अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी पडतील. मात्र त्यानंतर वातावरण पुन्हा कोरडे होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

अंदमानमध्ये २० मेच्या सुमारास मान्सून दाखल झाला. त्यामुळे ३० मे अखेरीस केरळात आणि पुढे राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र कोकण किनारपट्टी भागात मान्सूनची हजेरी यंदा लांबणार आहे. दरवर्षी साधारण ५ ते ७ जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊसयंदा १२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. या वेळी पावसाचा जोर असणार नाही. गेल्या वर्षी किनारपट्टी भागात २९ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेने ३९२ ‘फेस्टिव्हल विशेष गाड्या’ चालवण्याचा घेतला निर्णय

News Desk

राज्यसभा निवडणूक वाद, उच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

अखिलेश, लालूप्रसादसह चिराग पासवान यांची सुरक्षा काढली

News Desk