HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मुंबई | राज्यभरात दुष्काळ आणि उष्णतेचा कहर सोतत होती. परंतु राज्यात काल (९ जून) ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.  काल रात्री ११च्या सुमारास पावसाच्या रिमझिम सरी कोसळ्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.  पाऊस सुरु झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील ३६ हवामान विभागापैकी तब्बल २३ हवामान विभागात कमी तसेच अत्यंत कमी मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. केवळ एका विभागात सर्वाधिक जास्त तर ३ विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. ९ विभागात सरासरी पाऊस झाला.

 

 

 

Related posts

नारायण राणे यांना शिवसेना का घाबरते?

News Desk

राज्यभर पर्यटन पर्व मोठ्या उत्साहात

News Desk

पक्षासाठी आयुष्य वेचलेले सत्ते बाहेर तर राणें सारखे मंत्री कसे होतात ?

News Desk