HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, सदाभाऊ खोत घटनास्थळी, पोलिसांकडून अडवणूक

मुंबई। एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र हे आंदोलन थांबवत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन सरकारकडून केले जातेय. मात्र आजही एसटी कर्मचारी सलग १३ दिवशी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांच्या हाल सुरु आहेत. अशातच एसटी कामगारांनी आज थेट मंत्रालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र मुंबईच्या मानखुर्द जकात नाक्यावर आज एसटी कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक केली जातेय. दरम्यान या संपात आता आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील उडी घेतली आहे.

परंतु सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचारी संपावर ठाम

सदाभाऊ खोत मानखुर्ददरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाले आहेत. सायन-पनवेल महामार्गावर संपकरी एसटी कामगार पोहचताच पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पोलिसांकडून सदाभाऊ खोत, एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन रोखण्याचे आवाहन करत आहेत. परंतु सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचारी संपावर ठाम आहे.पोलिसांकडून रस्ता न रोखण्याचे आवाहन केले जातेय. यावर एसटी कर्मचारी मंत्रालयावर जाण्यासाठी याच मार्गाने जाणार असे सांगताय, मात्र पोलिसांनी रोखल्याने सदाभाऊ खोतांसह एसटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले.

तुमच्यात हिंमत असेल तर एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करा

यावेळी बोलताना मंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. सदाभाऊ खोत म्हणाले की, “पोलीस प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावर आंदोलनाना परवानगी दिली होती. यावेळी मंत्रालयावर आंदोलन न करण्याची मागणी आम्ही मान्य केली, मात्र राज्यभरातून येणाऱ्या विविध टोलनाक्यांवर एसटी कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक होत आहे मुंबईमध्ये कामगारांना येऊ दिले जात नाही. या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना म्हणाले होते की, एखादे आंदोलन किंवा मोर्चा आला तर माझा मंत्री सहाव्या मजल्यावर बसणार नाही तो मोर्चाला समोरे जात प्रश्न सोडवेल. मात्र उद्धव ठाकरेंचा सहाव्या मजल्यावरील मंत्री खाली आलाच नाही. परंतु आंदोलकांना रस्त्यावर अडवले जातेय, पोलिसांचा दबाव टाकला जातोय. त्यामुळे ठाकरेंच्या सरकारमध्ये शिवशाही नाही तर मुघलशाही आणली आहे. याचा मी निषेध करतो. अनिल परबांना आवाहन आहे की, पोलिसांच्या माध्यमातून गरीबांचे आंदोलन चिरडू नका. तुमच्यात हिंमत असेल तर एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करा. तुम्ही आयुष्यभर पोलीस संरक्षणात नाही राहू शकत. त्यामुळे ही महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मातीत गाठल्याशिवाय राहणार नाही.”

“लायकी नाही परिवहन मंत्री म्हणून राहण्याची”

राज्य सरकार जर एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर बसवत असेल ती हे राज्य हुकुमशाही पद्धतीने चाललं आहे, हुकुमशाही पद्धतीने चाललं आहे. गुंडागर्दी पद्धतीने चालले आहे. हिंमत असले तर त्यांनी आज गोळीबार करावा, लाठीचार्ज करावा आम्ही रक्त सांडू पण मागे हटणार नाही. शांततेत आंदोलन करत होतो तर पोलिसांच्या माध्यमातून शांतता भंग केली जातेय., आवाज दाबला जातोय, या सरकारचा निषेध करतो. जर अशाच प्रकारे कामगारांची अडवणूक केली गेली तर असेचं आंदोलनाला सुरुवात केली जाईल.” अस इशाराही खोत यांनी दिला.

कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणारी आर्यन खानची अवलाद

“एसटी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणारी आर्यन खानची अवलाद आहे का? अवमान याचिका आर्यन खानविरोधात करा ना. त्याच्यासाठी सर्व मंत्रीमंडळ कामाला लागले मात्र गरीबांवर अधिक अधिकार गाजवता यावे यासाठी न्यायालयात जातायत. हे लकवा, लूथ भरलेले सरकार आहे. नालायक सरकार मी कधी पाहिलेले नाही. अशीही टीका अनिल परब यांनी केली.राज्यभरातील एसटी कर्मचारी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होत असल्याने ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्य़ात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल पुन्हा चिडले, ‘या’ नेत्याला ‘दुसऱ्यांदा’ दिली शपथ

News Desk

पूरग्रस्त मुलीच्या लग्नाचा खर्च दीपाली सय्यद उचलणार!

News Desk

निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna