HW News Marathi
Covid-19

राज्यात आज एकाच दिवसात १२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद 

मुंबई | महाराष्ट्रात आज (८ ऑगस्ट) एका दिवसांतील कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंदीने उच्चांक गाठला आहे. राज्यात एकाच दिवसात तब्बल १२ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, राज्यात आज १२ हजार ८२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ लाख ३ हजार ८४ इतकी झायी आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाखांच्या पार गेला आहे.

राज्यासाठी दिलासादायक बाब अशी कि, या एका दिवसात तब्बल ११ हजार ८१ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या आता तब्बल ३ लाख ३८ हजार ३६२ इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची म्हणजेच ऍक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४७ हजार ४८ इतकी आहे. तर या एकाच दिवसांत राज्यात २७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडद्यावर खलनायक साकारणारा तू प्रत्यक्षात मात्र ‘हिरो’च !

News Desk

आपल्या जवळच्या वृत्तवाहिनीचे पितळ उघडे पडताच मदतीसाठी ‘भाजप’ची धडपड !

News Desk

अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल

News Desk