HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाचा कहर ! मृतांच्या आकड्याने गाठला उच्चांक

नवी दिल्ली । देशातील कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरत आहे. एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे आरोग्ययंत्रणेवरचा ताण ह्यामुळे स्थितीचिंताजनक बनली आहे. तर मृतांचा आकडाही धडकी भरवणारा आहे. देशात दररोज कोरोनामुळे हजारो मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांतला आकडा सर्वाधिक आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल ४ हजारांहून अधिक जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर याच २४ तासांत देशात तब्बल ४ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

देशात दररोज ४ लाखांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (८ मे) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १ हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, चिंताजनक बाब अशी की ह्याच एका दिवसात देशात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजेच ४ हजार १८७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार २७० इतकी झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊन हवा की नको ? लोकांनीच ठरवावं ! – मुंबई महापौर

News Desk

लग्न समारंभ व अंत्यसंस्कारमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे । आरोग्य मंत्रालय

News Desk

अनेक दिवसांनी राज्यात केवळ १० हजार रुग्ण आढळले

News Desk