HW News Marathi
Covid-19

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ५८ हजारांच्या पार

मुंबई । महाराष्ट्रातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१४ एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ५८ हजार ९५२ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत नवीन ३९ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण २९ लाख ५ हजार ७२१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सध्या राज्यात एकूण ६ लाख १२ हजार ७० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.२१ % झाले आहे. सध्याची कोरोनास्थिती नियंत्रणात आणणे हे राज्य सरकारपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक! मुंबईतील ३०५ इमारती BMCनं केल्या सील

News Desk

मुंबईत काम करणाऱ्यांना केडीएमसीच्या हद्दीत ‘नो-एन्ट्री’च्या आदेशाला स्थगिती

News Desk

कोरोना लसीकरणासाठी आता ‘कोविन’ ॲपची सक्ती रद्द!

News Desk