HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ८ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांची गेल्या २४ तासांत आकडेवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२० ऑक्टोबर) जाहीर केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल ७ हजार ४२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सातत्याने नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात असून कोरोनामुक्तांचा देखील आकडा वाढत असल्याने ही निश्चितच अत्यंत दिलासादायक बाब आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण तब्बल १३ लाख ९२ हजार ३०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख ७४ हजार २६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८६.०५ % इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १४,५१६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

परिस्थीती नियंत्रणात आली नाही तर पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल – जयंत पाटील

News Desk

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेच्या नव्या गाईडलाईन्स जारी

News Desk