HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या २६ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आमरण उपोषण करणार

मुंबई | मराठा समाजच्या आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला खासदार छत्रपती संभाजीराजे हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. टोकाची भूमिका घेऊ नका, असे समन्वयक समितने सांगितले होते. पण, राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे संभाजीराजेंनी आज (१४ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन सांगितले. संभाजीराजे आझाद मैदानात उपोषण करणार आहेत, असे ते म्हणाले. 

संभाजीराजे म्हणाले, “सर्व पक्षांच्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो की, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. न्यायालयात आरक्षण कशामुळे गेले हे सांगितले, परंतु यासंदर्भात राज्य सरकारकडून काहीच हालचाल झाली नाही. आरक्षण रद्द केल्यानंतर पुर्नविचार याचिका देखल करा, असे देखील मी सांगितले होते. मात्र, उशीराने पुर्नविचार याचिका दाखल केली. या पुनर्विचार याचिकेची काय परिस्थिती आहे, हे कोणालाच काही माहिती नाही. यासंदर्भात समिती स्थापन करा, असे माझे स्पष्ट मत आहे.”

आरक्षण ५० टक्क्यांवर द्याचे असेल तर त्याचे अपवादात्मक परिस्थिती असायला हवी, असे सर्वोच्च न्यायालयात म्हटले. ओबीसी समजाला आरक्षण हवे, पण, टिकणारे आरक्षण द्यावे. याआधी मी कोल्हापुरात मूक आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून मराठी आरक्षणासाठी संभाजीराजेंनी अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतली आहे. २००७ पासून राज्यात मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजू काढला आहे. मराठा समाज हा देखील वंचित घट आहे. मी मराठा आहे, त्यामुळे मी मराठा आरक्षणासाठी लढतो आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषेची चीड येते असे बोलणाऱ्या जान कुमार सानूवर मनसेचा हल्लाबोल!

News Desk

महाविकासआघाडीतील वादाचा नवा अध्याय!

News Desk

रिसोड येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मोर्चा

News Desk