HW News Marathi
Covid-19

खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घर

मुंबई | रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला क्वारंटाईन व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चे घर होम क्वारंटाईन म्हणून दिले. कोल्हापुरी पॅटर्नला हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील स्वत:चे घर देवून आज (२० मे) प्रत्यक्षात उतरविले आहे

कराड येथून रुकडी या गावात परतलेल्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याचा अहवाला निगेटिव्ह आला आहे. तरी त्यांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागते, अशा व्यक्ती आणि विद्यार्थ्यासाठी धैर्यशील मानेनी क्वारंटाईनसाठी स्वत:चे घर आपली वेगळी ओळख दिली आहे. स्वत:चे घर क्वारंटाईन म्हणून देणारे धैर्यशील माने हे पहिले खासदार आहेत. कोरोनाच्या संकटात प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीनने सरकारला मदत करत आहे. यात

गावाकडे परतलेल्या विद्यार्थ्याचा अहवाला निगेटिव्ह आला आहे. मात्र. त्या विद्यार्थ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना ‘कोल्हापुरी पॅटर्न’ची सुरुवात स्वत:पासून आज (२० मे) क्वारंटाईनसाठी धैर्यशील मानेंनी दिले आहे. यापूर्वी धैर्यशील मानेंनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी पराभूत केलेले तत्कालिन खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. राजू शेट्टी यांच्या आईच्या पाया पडून त्यांचेही आशिर्वाद घेतले होते. तसेच गेल्या वर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुरादरम्यान धैर्यशील माने हे स्वत: महापुरात उतरुन मदत करत होती. धैर्यशील माने यांनी स्वतः मदतीच्या साहित्याची पोती खांद्यावरुन ट्रकमधून उतरवली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

News Desk

रामदेवबाबांनी ‘ती’ चूक केली मान्य,अॅलोपॅथीला म्हणाले होते ‘मूर्ख विज्ञान’

News Desk

#Coronavirus : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ११३९ वर

News Desk