HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

मुंबई | दादरा हवेलीचे खासदार मोहनभाई संजीभाई देलकर यांचा मृतदेह मारिन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मोहन देलकर हे अपक्ष खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालाबेन देलकरक व दोन मुलं अभिनव व दिविता आहेत.

कोण होते मोहन डेलकर?

५८ वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन!

News Desk

उल्हासनगरात गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मृतदेहासह ठिय्या आंदोलन

News Desk

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते ‘सामना’ वाचत नसतील पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात!

News Desk