HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

MPSC परिक्षेचे नविन वेळापत्रक लवकरचं जाहीर करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

येत्या 11 तारखेला महाराष्ट्रात 200 जागांसाठी एमपीएससी परीक्षा जाहीर झाली होती. आज आमची बैठक झाली. गेल्या चार महिन्यात कोरोनाचं संकट आहे. गेल्या काही महिने अभ्यासिका, क्लासेस बंद होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आल्या, अभ्यासाला वेळ मिळायला हवा. त्यामुळे ही परीक्षा काही काळ पुढे ढकलत आहोत, यापूर्वी दोनवेळा परीक्षा पुढे ढकलली होती. आता पुढे जी तारीख ठरवू त्याच तारखेला काहीही करून परीक्षा होईल. जे 11 तारखेच्या परीक्षेला पात्र होते, ते सर्व पुढच्या तारखेला म्हणजे जी तारीख जाहीर होईल, त्या तारखेसाठी पात्र असतील, कोणाचंही वय वाया जाणार नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

Related posts

विधानसभेला आम्ही मनसेसोबत जाणार नाही !

News Desk

जनतेला दिलासा देण्यासाठी भाजप आमच्यासोबत आली तर स्वागतच, मनसेची बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

News Desk

मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप, राष्ट्रवादीमध्ये खळबळ

News Desk