HW News Marathi
महाराष्ट्र

‘एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा’-आदित्य ठाकरे

मुंबई। एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात आता टीका व्हायला सुरुवात झाली आहे. या आत्महत्येनंतर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर चांगलाच आक्रमक झालाय, नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे सूतोवाच केलं. मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात या सर्वच विषयांवर चर्चा होणार आहे, असं सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीवरही चर्चा होणार असल्याचे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले.

झेव्हियर्सच्या मैदानाचं काम होत आलं आहे. त्यामुळे आता ९० मिली पाऊस पडला तरी पाणी भरणार नाही. पाऊस पडल्यावर काम थांबवावं लागत आहे. अधिक क्षमतेच्या होल्डिंग टँक असाव्यात. मुंबईत पाणी तुंबणारच नाही असं म्हणता येणार नाही. पाऊस क्षमतेच्या बाहेर पडतो तेव्हा पाणी तुंबतं, असं ते म्हणाले.

गोपीचंद पडळकर आणि राम सातपुतेंचा घणाघात-

स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला घेरलं आहे. स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून आहे. स्वप्नीलप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट पाहत आहे का?, असा सवाल पडळकर यांनी केला. येत्या आठ दिवसात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देतानाच सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थांना तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

स्वप्निल लोणकर ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या असल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला. राज्यात लाखो शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुले ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. अनेक विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत, केवळ नियुक्त्या न दिल्याने प्रक्रिया रखडली आहे. राज्य सरकारला केवळ पार्थ पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याच करिअरची चिंता आहे, पण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच काही देणघेण नाही, अशी टीकाही आमदार राम सातपुते यांनी केली. या अधिवेशनात विधानसभेच्या दारावरती एमपीएससीची पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार असल्याचा इशारा राम सातपुते यांनी यावेळी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर आक्षेपार्ह उल्लेख

News Desk

३१ डिसेंबरला तब्बल ४५५ तळीरामांवर पोलिसांची कडक कारवाई

News Desk

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी! – उपमुख्यमंत्री

Aprna