HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

अंधेरीतील एमआयडीसीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या १९ गाड्या घटनास्थळी

मुंबई | अंधेरीतील एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रोल्टा कंपनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सर्व्हर रुमला आग लागल्याची माहिती मिळाळी आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निश्मन दलाच्या १९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने इमारतीत कुणीही अडकले नसल्याची माहिती आहे. ही आग लेव्हल-४ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने आजूबाजूच्या इमारती रिकाम्या केल्या आहेत. आग लागलेल्या इमारतीत कोणीही अडकलेले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. गेल्या चार तासापासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. ही आज (१३ फेब्रुवारी) दुपारी एकच्या सुमारास या आगीवर नियंत्रण येईल असे वाटत होते. मात्र, आता ही आग आणखी भडकत असल्याने चिंता वाढली आहे.

Related posts

सॅनिटरी नॅपकिनवर आता जीएसटी नाही

News Desk

रामनाथ कोविंद यांचा उद्धव ठाकरेंना

News Desk

‘अंडे आणि कोंबडी’ला शाकाहारीचा दर्जा द्या | संजय राऊत

News Desk