मुंबई | सुशांत सिंह मृत्यू प्रकऱण आता बिहार सरकारच्या मागणीनुसार सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना अद्यापही होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याने बिहार पोलीस कायदेशीर मार्गाने मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांनी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केल्याने विनय तिवारी तपासासाठी बिहारमधून मुंबईत दाखल झाले होते. पण मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.
“आयपीएस विनय तिवारी यांना अद्यापही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. महाधिवक्तांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे,” असं डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे.
#WATCH IPS #VinayTiwari has still not be exempted from quarantine, it is like house arrest. We 'll decide what action to take after consultation with the advocate general. Going to the court is also an option, says #Bihar DGP Gupteshwar Pandey pic.twitter.com/Or94KTCsDR
— ANI (@ANI) August 6, 2020
“बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय अव्यवहार्य आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याप्रकरणी आपलं निरीक्षण नोंदवलं आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेने विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे गुप्तेश्वर पांडे यांनी जबरदस्तीने क्वारंटाइन करण्यात आल्याचा आरोप केला.
Mumbai police's move of quarantining Bihar Police officer is unprofessional. Even, Supreme Court has given its observation in the matter. Still, there is no positive response from them (Mumbai police). Tiwari has still not been freed: DGP Bihar on #SushantSinghRajput death case pic.twitter.com/uRmCk5ZIAM
— ANI (@ANI) August 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.