HW News Marathi
Covid-19

महिलांची इथेही बाजी ! कोरोनावर मात करण्यात महिला आघाडीवर !

मुंबई| मुंबईमध्ये वाढत चाललेला कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत आहे,मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होते आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टी भागांमध्ये महापालिकेकडून सीरो सर्व्हे नुकताचं करण्यात आला. मुंबईत तीन वॉर्डातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने हा सीरो सर्व्हे केला. या सर्व्हेतील माहितीनुसार पुरूषांच्या तुलनेत महिला कोरोनावर मात करण्यामध्ये आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे

मुंबईत कोरोना संसर्ग हा महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक प्रमाणात झाला आहे तर दुसरीकडे मुंबईतील तब्बल 59.3 टक्के महिलांच्या शरीरात कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत.

महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सीरो सर्व्हेतील एकूण नमुन्यांपैकी 2 हजार 297 म्हणजेच 59.3 टक्के महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडी असल्याचं आढळून आलं. त्या तुलनेत पुरुषांमध्ये फक्त 1 हजार 937 म्हणजे 53.2 टक्के कोरोना अँटिबॉडी तयार झाल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट झालं. पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरात कोरोना विरोधातील अँटिबॉडिज अधिक प्रमाणात विकसित झाल्या आहेत.झोपडपट्ट्यांमधील महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडीचं प्रमाण सर्वाधिक असल्याचंही हा सर्व्हे सांगतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ब्लॅक फंगस’ला महामारी घोषित करा, औषधांचा साठाही उपलब्ध करा, सोनिया गांधींचं मोदींना पत्रं

News Desk

पुणे जिल्हयातील ‘या’ तालुक्यात पर्यटनासाठी नागरिकांना असणार बंदी

News Desk

यंदा १ जूनलाच मान्सून केरळमध्ये होणार दाखल, हवामान विभागाचा अंदाज

News Desk