HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅक!

मुंबई। मुंबई पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक करण्यात आला आहे. हॅकर कडून ‘जेके हल्ल्या मागील दहशतवादी मुंबईत ठार’ या आशयाचा ई-मेल मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागातून राज्यभरातील पोलीस ठाण्याच्या अधिकृत ई-मेल आयडी वर पाठवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य सायबर विभागाकडून हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून या मेल सोबत येणारी फाईल उघडू नये असे आवाहन राज्य सायबर सेलकडून राज्यभरातील पोलिसांना करण्यात आले आहे.

सायबरचे गुन्हे दाखल होऊन तपास केला जात आहे

मुंबई पोलिसांकडून सायबर गुन्हे विभाग व्यतिरिक्त प्रत्येक प्रादेशिक विभागात सायबर विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबई पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य असे पाच सायबर विभाग सुरू करण्यात आलेले आहे. प्रत्येक सायबर विभागात त्या त्या प्रादेशिक विभागातील पोलीस ठाण्यातील सायबरचे गुन्हे दाखल होऊन तपास केला जात आहे. यापैकी पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक करण्यात आला आहे.

ही फाईल उघडल्यानंतर संगणकातील डेटा चोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

या हॅकर कडून पूर्व सायबर विभागाच्या अधिकृत मेल आयडी वरून राज्यातील सर्व पोलीस ठाणे, शासकीय विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांना फिशिंग मेल पाठवण्यात येत आहे. या ई मेल मध्ये इंग्रजी मध्ये जेके हल्ल्या मागील दहशतवादी मुंबईत ठार या आशयाचा मेल आणि सोबत ‘रिपोर्ट इंटेलिजन्स’ नावाने पीडीएफ’ फाईल पाठवली जात आहे. ही फाईल उघडल्यानंतर संगणकातील डेटा चोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रकरण ‘महाराष्ट्र सायबर विभागाने गंभीरतेने घेतले असून राज्यभरातील पोलीस ठाणे शासकीय विभागाला सतर्क करण्यात आलेले असून या आशयाचा ईमेल उघडू नये तसेच त्यासोबत असलेली पीडीएफ डाउनलोड करू नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी पत्रक पाठवून केले आहे.या प्रकारे ई मेल हॅक करून पोलीस दलाचा महत्वाचा डेटा चोरी करण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आले असावे, तसेच हा गंभीर प्रकार असून या प्रकारे फिशिंग मेल पाठवून हॅकरकडून सायबर हल्ला घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या सांगलीकरांवर पोलिसांची कारवाई

swarit

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे! – देवेंद्र फडणवीस

Aprna

राष्ट्रवादीला गळती नाही, ‘हा’ तर राजकीय भ्रष्टाचार !

News Desk