HW News Marathi
Covid-19

लस निर्मितीसाठी मुंबईतील ‘हाफकिन’ सज्ज, केंद्राकडून ६५ कोटींचा निधी जाहीर

मुंबई । केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना परवानगी दिली आहे. ज्यामध्ये मुंबईच्या हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचाही समावेश आहे.त्यामुळे, आता हाफकीन ही राज्य सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी दर महिन्याला 2 कोटी कोवॅक्सिन लसींचे उत्पादन करणार आहे. केंद्राने हाफकीनला ६५ कोटी रुपयांचे अनुदान देखील जाहीर केले आहे.

भारत बायोटेकच्या तंत्रज्ञानाद्वारे आता हाफकिन दर महिन्याला या २ कोटी लसींचे उत्पादन करणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन होऊ शकणार आहे. दरम्यान, मुंबईतील हाफकीनसह इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड (IIL), हैदराबाद, भारत इम्युनोलॉजिकल अँण्ड बायोलॉजिकल लिमिटेड, बुलंदशहर (BIBCOL) या कंपन्यांना देखील केंद्र सरकारकडून लस उत्पादन करण्यासाठीची परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारने हैदराबादच्या इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड (IIL) केंद्राने ६० कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. तर बुलंदशहर येथील भारत इम्युनोलॉजिकल अँण्ड बायोलॉजिकल लिमिटेड (BIBCOL) या कंपनीला केंद्राकडून ३० कोटींचे अनुदान देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत २४,४२९ नवे रुग्ण आढळले

News Desk

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट!

News Desk

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांविरोधात संसदेत काँग्रेसची विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस

News Desk