HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत !

मुंबई | मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरु करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.त्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही नियम आणि अटी ठेवून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करता येईल. मात्र, त्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

“लोकल सुरु करा, अशी प्रवाशांची मागणी आहे. लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र, राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करु”, असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादेत भव्य मराठा क्रांती रॅली

News Desk

खासगी कंपनीच्या माध्यमातून सदाभाऊ इस्त्राईलच्या दौऱ्यावर

News Desk

‘१९ जुलैला होणाऱ्या ‘त्या’ ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित!

News Desk