HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

….तर मुंबईत पुन्हा कोरोना संदर्भात कठोर निर्णय घेतला जाईल!

मुंबई | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाला चिंता जाणवायला लागली आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि प्रतिबंधात्मक नियम धुडकावून शहरात ठिकठिकाणी होणारी गर्दी यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्याचा सूचक इशाराही दिला आहे. दरम्यान महापालिका मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

“महापालिका मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे. जर करोना रुग्ण वाढत राहिले आणि लोकांनी कोरोनासंबंधीत नियमांचं उल्लंघन केलं तर महापालिका पुढील १० दिवसांत कठोर निर्णय घेताना अजिबात मागे पुढे पाहणार नाही,” असा इशारा सुरेश काकाणी यांनी दिला आहे.

 

परदेशातून आणि इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. नियमित विभागवार केलेल्या चाचण्या बंद झाल्या आहेत. आत्ता झोपडपट्टीतील रुग्णसंख्या कमीच असून आता आढळलेले रुग्ण हे गृहनिर्माण संकुलातील आहेत. त्यातही अधिक रुग्णांचे निदान हे विमानतळ, रेल्वे स्थानके आणि पालिकेच्या रुग्णालयातील विभागांमध्ये केलं जातं. त्यात प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही योग्य रीतीने केलं जात नसल्याचं,” सुरेश काकाणी यांनी याआधी सांगितलं होतं.

Related posts

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा, रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

दिव्यांगांकडून शिवसेनेला 20 दिवसांचा अल्टीमेटम

News Desk

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीत; मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

News Desk