HW News Marathi
महाराष्ट्र

महापौर किशोरी पेडणेकरांना पत्रातून दिली जीवे मारण्याची धमकी, अश्लिल भाषेचाही वापर

मुंबई | मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात महापौरांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर महापौरांच्या कुटुंबियांना गोळ्या घालून मारण्याची धमकी या पत्रात दिली आहे. महापौर यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्याची माहिती टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना केली आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळ केला आहे. आणि कुंटुंबियांना गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी कुटुंबियांच्या संरक्षणांची मागणी केली आहे.

महापौरांनी लिहिलेल्या धमकीच्या पत्रात म्हटले, माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघशील तर परिणाम वाईट होतील. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर केला आहे. महापौरांना गेल्यावर्षीही फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. किशोरी पेडणेकरांना महापौर झाल्यापासून दुसऱ्यांदा धमकी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. हे पत्र पनवेलहून पोस्ट करण्यात आले असून पाकीटावर वेगळे नाव आणि पत्ता आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित!

News Desk

डॉक्टर्स नसतील तर समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावा खडसेंची सरकारवर आगपाखड 

News Desk

शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा पुढे नेणारे राजर्षी शाहू महाराज हे रयतेचे राजे म्हणून कायम हृदयात राहतील! – अजित पवार

Aprna