HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर होम क्वारंटाईन

मुंबई | मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढ आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:हून होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबईमधील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज (२० एप्रिल) मिळाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या पत्रकारांनपैंकी किती पडणेकर यांच्या संपर्कात आले यांचा शोध सुरू असून किशोरी पडणेकरांनी स्वत:हून पुढचे १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.

तापर्यंत मुंबईत २ हजार ७२४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ४८३ वर पोहोचली आहे. राज्यात आज सकाळी ११ वाजेपर्यंत नव्या २८३ रुग्णांची वाढ झाली. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील अनेक भागांची पाहणी केली आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्या भागांचीदेखील त्यांनी पाहणी केल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला करमणुकीची गुढी उभारली | राम कदम

News Desk

काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात देशमुख यांना उमेदवारी

News Desk

लस खरेदीचे 7 हजार कोटी वाचल्याने बारा बलुतेदार, शेतकऱ्यांना पॅकेज द्या, भाजपची मागणी

News Desk