HW News Marathi
Covid-19

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोनाची लागण

मुंबई | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: महापौर पेडणेकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावे असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. “मी कोविड अँटीजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली, कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन”, असं ट्वीट किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
किशोरी पेडणेकरांनी मुंबईत लॉकडाऊनला सुरुवात झाल्यापासून अनेक उपाययोजना करताना दिसत होत्या. स्वत: रस्त्यावर उतरुन त्या कोरोना स्थितीचा आढावा घेत होत्या. अनेक रुग्णालयांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष भेटी, कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली होती. तसेच, परिचारिकेचा गणवेश परिधान करुन नर्सना प्रोत्साहन, अशा विविध रुपात किशोरी पेडणेकर पाहायला मिळाल्या होत्या, त्यांनी स्वत: परिचारिका म्हणून आधी काम केले आहे. तसेच, त्यांच्या भावाचाही कोरोनामूळे मृत्यू झाला होता.
यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. किशोरी पेडणेकर या ग्राऊंडवर असल्याने, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. इतके दिवस कोरोनाचा मुकाबला केल्यानंतर, आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या होत्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तू न वापरण्याची घेतली शपथ

News Desk

‘वर्क फ्रॉम नेचर’, ‘वर्क विथ नेचर’ संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद; एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी

Aprna

देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे केंद्राचे प्रयत्न सुरू

News Desk