HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू

मुंबई | मुंबईमध्ये पहिले ते सातवीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरू करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिले आहेत. मुंबईत १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाच्या नव्या व्हेरीएंट ओमायक्रॉनच्या भीतीमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ठकला होता. आता आज (१५ डिसेंबर) मुंबईतील प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरातील जवळपास १६ लाख ३९ हजार ५७८ विद्यार्थी हे दीड वर्षानंतर शाळेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, पुणे महापालिकामध्ये उद्यापासून (१६ डिसेंबर) शाळा सुरू होणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दती पहिली ते सातवीच्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहे. तर औरंगाबादमध्ये पालिका क्षेत्रातील शाळा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. शाळांनी कोरना नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात २५ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून दिली होती. यावेळी ग्रामीण भागात पहिली ते चौथी सुरू होणार होत्या. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवी ते बारावी वर्ग सुरू झाल्या होत्या. तसेच शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यास चाईल्ड टास्क फोर्सने परवानगी दिल्याची माहिती गायकवाडांनी दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डाळींवरील साठवणुक मर्यादा हटवणार – रामविलास पासवान

News Desk

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

News Desk

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात – डॉ. वीरेंद्र तावडेला जामीन

News Desk