HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात ३ घरे कोसळली, १ मृत्यू

मुंबई । मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे काल (९ जून) दुर्घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच आज (१० जून) दहिसरमध्येही एक दुर्घटना घडली आहे. दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात घरे कोसळल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येत आहेत.

दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागातील ३ घरे कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शहरातील या वाढत्या दुर्घटना निश्चितच प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे.

Related posts

‘उद्धवजी, देर आये दुरुस्त आये!’भाजप आमदाराची टिका ..

News Desk

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल – अजित पवार

News Desk

बैलगाडी शर्यतीवर बंदीच!

News Desk