HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस बदली प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदविला; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

मुंबई | पोलीस बदली प्रकरणी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी तब्बल दोन दास चौकशी केली आहे. यानंतर फडणवीस हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांनी फडणवीसांची चौकशी केली आहे. या चौकशीनंतर फडणवीस हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असून यात फडणवीस चौकशीदरम्यान त्यांना पोलिसांनी काय विचारले. यासंदर्भात काही खुलासे करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आज (१३ मार्च) फडणवीसांच्या सागर निवासस्थानी दुपारी १२ वाजता चौकशी करण्यास सुरुवात केली. फडणवीसांना बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. परंतु, पोलीस फडणवीसांच्या निवासस्थानी येवून त्यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून पुण्याच्या महापालिकेच्या बाहेर महाविकासआघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर मुंबईत सुद्धा फडणवीसांच्या निवसस्थाना बाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. फडणवीसांनी काल पत्रकार परिषद घेत म्हटले की, मी स्व:ता एक वकील आहे. आणि राज्याचा गृहमंत्री सुद्धा राहिलो आहे. त्यामुळे मी मुंबई पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणार आहे, असे ट्वीट करून माहिती दिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचं सुचक वक्तव्य

News Desk

“मोठ्या कडून नाही पण धाकट्या कडून अपेक्षा आहेत..” , तेजस ठाकरेंच्या प्रवेशावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

News Desk

राज्यातील सत्तापेचादरम्यान राज्यपालांच्या भूमिकेमुळे काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

News Desk