मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी काही आदेश काढले होते. ज्यात त्यांनी असे म्हटले होते की २ किमीच्या बाहेर नागरिकांना विनाकारण जाण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्बंधांविषयी नवी माहिती दिली आहे. नव्या आदेशात २ किलोमीटरच्या ‘लक्ष्मणरेषे’चा स्पष्ट उल्लेख केला नाही आहे. मात्र जवळच्या जवळ जाणे बंधनकारक असेल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
दुकाने, मार्केट, केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, शारीरिक व्यायाम यासाठी जवळच्या जवळ जाणे बंधनकारक राहील, असे नव्या आदेशात म्हटले आहे. पहाटे ५ ते संध्याकाळी ७ या दरम्यान नागरिकांना त्यांच्या शेजारच्या मोकळ्या जागांवर सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे आणि व्यायाम करण्यासाठी जाता येणार आहे. तसेच, हे नवे आदेश १५ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
For The Love Of Mumbai
-Use neighbourhood shops for permitted purchase & services b/w 5am-9pm
-Carry office ID/documents to travel for permitted work
-No crowding,for your own safety u/s 144
-Night curfew b/w 9pm-5am except for emergency/medical services & supplies #SafetyFirst pic.twitter.com/4myc4M0Eg4— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) July 2, 2020
पोलिसांनी आधी जारी केलेल्या नियमावलीनुसार, घरापासून फक्त २ किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल, असे ट्विट करत म्हटले होते. मात्र नव्या आदेशात ‘जवळ’ या शब्दाची नेमकी व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही.
काय आहेत नवे नियम?
-परवानगी दिलेल्या खरेदी व सेवांसाठी शेजारच्या दुकानांचा वापर करा. (पहाटे ५ ते रात्री ९)
-परवानगी दिलेल्या कामासाठी प्रवास करताना ऑफिसचे ओळखपत्र/ कागदपत्रे बाळगणे गरजेचे.
-स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही गर्दी करु नका (कलम १४४)
-आपत्कालीन / वैद्यकीय सेवा आणि पुरवठा वगळता रात्रीचा कर्फ्यू – रात्री ९ ते पहाटे ५
-पहाटे ५ ते संध्याकाळी ८ या दरम्यान नागरिकांना त्यांच्या शेजारच्या मोकळ्या जागांवर वैयक्तिक शारिरीक व्यायाम (सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे) यासाठी जाता येईल.
– कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मज्जाव
– मुंबई शहरात रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत बाहेर फिरण्यास बंदी
अपवाद :
1. अन्न, भाजी, दूध, रेशन आणि धान्य पुरवठा
2. हॉस्पिटल, औषधे, फार्मास्युटिकल निगडीत कामे
3. टेलीफोन आणि इंटरनेट सेवा
4. बॅंकिंग, स्टॉक एक्स्चेंज
5. आयटी सेवा
6. प्रसारमाध्यमे
7. बंदरे
8. अन्न, धान्य आणि आवश्यक सेवांची होम डिलिव्हरी
9. ई-कॉमर्स सेवा
10. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
11. गोदामे
आधीच्या आदेशात काय लिहिले होते?
– घरापासून फक्त २ किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. २ किमीच्या बाहेर जाऊ नये.
– व्यायामाची परवानगी घरापासून २ किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.
– कार्यालय किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच २ किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.
As the city reopens in phases under the guidelines of the State Government, it has been observed that many are violating the norms.
We appeal Mumbaikars to act responsibly & follow these guidelines at all times so that we can defeat COVID-19.#UnlockResponsibly pic.twitter.com/cj1aEr7nT1
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.