HW News Marathi
महाराष्ट्र

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवण्याची शक्यता

मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या एकाच विषयाने खळबळ माजली आहे ती म्हणजे रेणू शर्मा या महिलेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे. बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. परंतु, आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आता मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की, एखादी महिला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात तक्रार दाखल करत असेल, तर त्याबाबत तक्रार दाखल करुन त्यासंदर्भातील चौकशी तत्काळ सुरु करण्यात यावी, असे आदेश आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का? आणि पुढे काय होणार हे पाहावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षणाचा खेळखंडोबा भाजपाने मांडलाय – जयंत पाटील

News Desk

परळी काॅंग्रेस शहराध्यक्षांसह जवळपास २५ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Aprna

कारशेड आरे कॉलनीतून दुसरीकडे नेण्याचा निर्णय पुर्णपणे चुकीचा – देवेंद्र फडणवीस

News Desk