मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हा ५२१८ वर पोहोचला आहे. काल (२१ एप्रिल) एकूण ५५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तसेच, दिलासादायक बाब म्हणजे ७७२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 552 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 5218 अशी झाली आहे. यापैकी 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 21, 2020
तर दुसरीकडे पुण्यात काल (२१ एप्रिल) दिवसभरात ४२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ७०८ इतकी आहे. तर काल ३ वर्षांची लहान मुलगी आणि ९२ वर्षांच्या आजीही कोरोनामुक्त झाल्या. त्यामुळे पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ८७ वर गेल्याची माहिती पुण्याचे महापौर मुलरीधर मोहोळ यांनी दिली आहे.
आणखी १९ रुग्ण कोरोनामुक्त !
कोरोनामुक्त १९ रुग्णांपैकी १५ रुग्णांवर 'नायडू' आणि 'सिम्बॉयसिस' रुग्णालयात उपचार सुरू होते. तर उरलेल्या चौघांवर नायडू रुग्णालयात उपचार करण्यात आले. 'नायडू' आणि 'सिम्बॉयोसिस'मधील डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
पुणे शहर कोरोनामुक्त : ८७#Pune
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 21, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.